जळगाव राजमुद्रा | जळगाव जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून तरुण-तरुणी दाखल झाले असून पोलीस भरती प्रक्रिया जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबवली जात आहे. यामध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कोणतेही दिरंगाई होणार नाही यासाठी काळजी घेतली जात आहे. 137 जागांसाठी होणाऱ्या जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या भरतीमध्ये अनेक तरुणांनी सकाळी चार वाजेपासून भरती प्रक्रियेसाठी रांगा लावल्याचे दिसून आले आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या पोलिस राऊंडमध्ये संपूर्ण यंत्रणा पोलीस भरती प्रक्रियेसाठी तयार करण्यात आली आहे 137 जागांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांचे एकूण 657 झाले आहेत आज 500 उमेदवारांना शारीरिक तसेच मैदानी चाचणीसाठी जिल्हा पोलीस दलाकडून कळवण्यात आलं होतं जळगाव शहरातील पोलीस खाव्यात मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेसाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहाटेपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून राज्यभरातील तरुण-तरुणींचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच धावण्याच्या चाचणीसाठी इलेक्ट्रॉनिक विशेष यंत्र (चीप) चा वापर केला जात आहे. आज पासून एकूण सात दिवस पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार असून संपूर्ण भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत कटाक्षाने पार पाडले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पोलीस भरती प प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. तरुण-तरुणींची प्रचंड मेहनत गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती, अखेर पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या तरुण-तरुणींच्या अग्नि परीक्षेला अखेर सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेत नेमकं कोणाचे नशीब चमकते हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.