पाचोरा राजमुद्रा | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचे स्थिती आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे पाचोरा भडगाव मतदार संघामध्ये शिंदे गटाचे किशोर पाटील भाजपचे तालुकाध्यक्ष आमने-सामने उभे टाकले गेले आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकमेकाला राजकीय आव्हान देण्यासाठी थेट चॅलेंज करीत असल्याचे दिसून आले आहे. चॅलेंज पूर्ण करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या असं थेट आव्हान अमोल शिंदे यांनी केल्याने महायुती मिठाचा खडा पडला आहे.
सिद्ध न केल्यास राजकीय संन्यास घ्यावा
अमोल शिंदे हे उमेश पाटील करण पाटलांसोबत मातोश्रीवर गेले होते हे सात दिवसात सिद्ध करावे जर सिद्ध केले तर शिंदेंनी स्वतः राजकीय संन्यास घेण्याची तयारी केली आहे मात्र हे सिद्ध न केल्यास किशोर पाटील यांनी राजकीय संन्यास घ्यावा असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिले आहे. या वादामुळे महायुतीमध्ये एक नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांनी अमोल शिंदे यांचा पराभव झाला होता व शिंदे गटाचे किशोर पाटील हे अवघ्या काही मतांवर निवडून आले होते, तोच रिपीट सीन होण्यापूर्वी दोघांमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शाब्दिक चकमक उडाल्याच बघायला मिळत आहे.
भाजप तालुका अध्यक्ष असलेले अमोल शिंदे यांच्या आव्हाना बाबत अद्याप पर्यंत किशोर पाटील यांनी कुठलेही भाष्य केलेले नाही मात्र अमोल शिंदे यांचे राजकीय आव्हान शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील स्वीकारतील का अशी राजकीय चर्चा जोर धरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच महायुतीमध्ये राजकीय ताण-तणाव बघायला मिळत आहे. भाजपाचे पदाधिकारी असताना अमोल शिंदे यांनी गेल्या विधानसभेमध्ये बंडखोरी करीत किशोर पाटील यांच्या विरोधात उमेदवारी केली होती त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत पुन्हा होते का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोशल मीडियात वार
भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिलेल्या शैलेंजवरून त्यांनी सोशल मीडियातून वार सुरू केले आहे.
” काय मग आमदार साहेब मी मातोश्रीवर जाऊन आल्याचा पुरावा देताय ना.. जनतेला आठवड्याचे मुदत दिली आहे तुम्हाला… माझा मातोश्रीचा भेटीचा पुरावा दिला तर मी राजकीय आयुष्यातून संन्यास घेईल नाहीतर तुम्ही राजकीय संन्यास घ्यावा अशा आशयाच्या मजकूर असलेल्या पोस्ट सोशल मीडियावर अमोल शिंदे यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हायरल करण्यात येत आहे
या भातामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे महायुतीत कुठल्याही तणावणी असे दावे महाजन यांनी केले होते मात्र आता प्रत्यक्ष सोशल मीडिया तसेच माध्यमांमधून महायुती तणावाचे वातावरण आहे हे स्पष्ट झाले आहे शिंद गटाचे आमदार किशोर पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता मात्र तरी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना अपयश आल्याचा पाहायला मिळत आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अमोल शिंदे यांनी दिलेल्या चॅलेंजचे काउंट-डाऊन सुरू केले आहे. यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व असलेल्या महाजन यांचे प्रयत्न सिमेंट घालण्यासाठी सपशील अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे. हा वाद नेमका कोणत्या टोकाला जातो हे येणाऱ्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.