जामनेर राजमुद्रा | केतक निंबोरा गावात सहा वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासवर्ग केल्यानंतर अवघ्या काही तासातच संशयताला अटक करण्यात आले आहे मात्र अटक झालेल्या संशयताला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक केली आहे मागणी पूर्ण झाल्यामुळे संतप्त जमावाने आक्रमक भूमिका घेत हे दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे.
संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्टेशनच्या आवारात जाळपोळ केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे अवघ्या काही वेळा घटनेची माहिती मिळतात पोलीस अधीक्षक रेड्डी हे घटनास्थळी दाखल झाले असेल दंगा नियंत्रण पथक देखील पाचारण करण्यात आले आहे जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता असून कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.
केतत निंबोरा गावात झालेल्या घटनेमुळे संपूर्ण गावात संतांचे वातावरण निर्माण झाले आहे . यामुळे गेल्या अनेक दिवसापासून घडलेल्या घटने मध्ये संशयित असलेला आरोपी फरार होता, मात्र आठ दिवसात स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आल्याने काही तासातच संशयताला अटक करण्यात आल्याने या गुन्ह्यामध्ये तपास चक्रे गतिमान करण्यात आली आहे.