जळगाव राजमुद्रा | जागतिक योगदिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून आयएमए जळगावतर्फे वृक्षारोपण व संवर्धन प्रकल्प टप्पा १ चा औपचारिक कार्यक्रम, मोहाडी येथील महिला व सामान्य रुग्णालय जळगाव येथे संपन्न झाला.
सुमारे २०० भारतीय व स्थानिक पर्यावरणास अनुकूल असे रोपांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण सोनवणे, आयएमए पदाधिकारी,
डॉ. अनिल पाटील, डॉ. स्नेहल फेगडे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आयएमए अध्यक्ष डॉ.सुनील गाजरे, उपाध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे व सचिव डॉ.अनिता भोळे तसेच प्रकल्प देणगीदार ,रुग्णालयातील परिचारिका व कक्षसेवक यांच्या ही हस्ते वृक्षारोपण झाले. तीन वटवृक्षावरो पण देखील वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे.
वृक्षारोपण समिती मध्ये डॉ.सुदर्शन नवल , डॉ हेमंत पाटील,
डॉ अजय शास्त्री,डॉ भरत बोरोले ,डॉ संजीव चौधरी,डॉ रती महाजन,डॉ अतुल चौधरी,डॉ निरंजन चव्हाण,डॉ राजेश कोलते ,डॉ भावना चौधरी ,डॉ वैशाली चौधरी ,डॉ शितल अग्रवाल यांनी परिश्रम घेतले आहे.डॉ.निरंजन चव्हाण,
डॉ मनोज टोके,डॉ अजय शास्त्री,डॉ.राजेश कोलते डॉ अमोल महाजन,डॉ धीरज माहेश्वरी,डॉ सुदर्शन नवल, डॉ.मनोज पाटील (न्यूक्लियस),डॉ.हेमंत पाटील,डॉ नरेंद्र भोळे,डॉ कल्पेश गांधी,डॉ. स्नेहल नितीन पाटील आदी मान्यवरांच्या सहकार्यातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयएमएच्या वतीने डॉ.अनिता भोळे यांनी आभार मानले आहे.