मुंबई राजमुद्रा | राज्यात ओबीसी आंदोलने पेट घेतलेला असताना भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. ओबीसी नेत्यांना संधी द्या, पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाने भाजपामध्ये पंकजा मुंडे यांना पुन्हा मोठी संधी मिळणार अशा चर्चेला सुरुवात झाली आहे. भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्या वरून नेमकं पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाबाबत काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे व ओबीसी समाजाचे लक्ष लागून आहे.
बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा अवघ्या काही मतांनी राष्ट्रवादीचे बजरंग बप्पा सोनवणे यांनी पराभव केला यामध्ये जातीय शक्ती सक्रिय झाल्याचा फटका भाजपने ते पंकजा मुंडे यांना बसल्याचे विधान भाजप पदाधिकाऱ्यांनी केले होता. या सोबतच भाजपमधील काही नाराजांनी विरोधी उमेदवाराला मदत केल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असा आरोप देखील करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ओबीसी आंदोलनाने पेट घेतलेला असताना पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाबाबत केलेलं विधान महत्त्वाचे मानले जात आहे पंकजा मुंडे यांच्या पुनर्वासन करून ओबीसींची नाराजी दूर करून भाजप ओबीसीन सोबत असल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ओबीसींच्या नाराजीचा कुठलाही फटका आगामी निवडणुकांमध्ये बसू नये म्हणून भाजपनेच्या पंकजा मुंडे यांचा पुनर्वसनाचा विषय सुरू झाला का ? याबाबत राजकीय विश्लेषक तर्क लावत आहे.