मुंबई राजमुद्रा | राज्यातील भाविक भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाची बातमी दिली आहे. शासनाकडून लवकरच मुख्यमंत्री देवदर्शन योजना राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष योजना आणली आहे यामध्ये धार्मिक तीर्थ क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टीने देखील चालना मिळणार आहे.
राज्यात अनेक ज्येष्ठ नागरिक असून यामध्ये इच्छा असणाऱ्या नागरिकांना पैशाअभावी देवदर्शन करता येत नाही ज्यांना परवडत नाही असे ज्येष्ठ नागरिक सहकुटुंब दर्शनाला जाऊ शकत नाही, अनेकांची परिस्थिती बिकट असल्याकारणाने उतरत्या वयात कमाईचे साधन नसल्याने देवदर्शनाला मुकावे लागते , यामुळे आपल्या धार्मिक तीर्थक्षेत्रांच दर्शन जेष्ठ नागरिकांना करता येत नाही, भाविक भक्तांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राज्यात लागू करण्यात असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लवकरच या योजनेचा अहवाल शासनाकडे सादर करून योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे राज्यातील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राज्याचा अर्थसंकल्प नुकताच पावसाळी अधिवेशनादरम्यान सादर करण्यात आला यामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, व युवा वर्गाला केंद्रित करून विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. महिलांसाठी सर्वाधिक योजना यासोबत युवा वर्गासाठी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी योजनांचा महापूर सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. मात्र उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात टीका टिपणी विरोधकांकडून करण्यात आले आहे सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठा कलगीतुरा रंगल्याचा पाहायला मिळाल.
या योजनेसंदर्भात अहवाल तयार करताना तिकीट दर कसे असणार ? शुल्क माफी देण्यात येईल का? या योजनेअंतर्गत कोणकोणत्या देवस्थानांचा समावेश असणार ? याबाबत सरकार विचाराधीन आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर किती भार पडणार ? हे लवकर स्पष्ट होणार आहे.