जळगाव राजमुद्रा | iमहाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी भारतीय घटनेच्या कलम 15(4),15(5),16(4),46 नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (एस ई बी सि )(socially and educationally backward classes ) अशा नवीन वर्ग तयार झाला असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित अधिनियमातील कलम 5(1 ) अन्वय सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवा मधील शासकीय व निम शासकीय सेवेत सरळंसेवा भरतीच्या पदामध्ये दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. आगामी होणारे विद्यापीठातील भरती प्रक्रिया शासनाने विहित केलेल्या बिंदू नामावलीनुसार करण्यात यावी अशी मागणी कुणाल पवार यांनी केली आहे.
यंदा होऊ घातलेल्या विद्यापीठ जाहिरात क्रमांक सात ऑब्लिक 23 सहाय्यक प्राध्यापक भरती ही 12 वर्षांनी होत आहे. मराठा समाजाच्या पात्र उमेदवाराला अन्याय न होऊ देता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. बी सी 2021 प्र .क 387/16 ब (ए ), दि. 6/7/2021 च्या अनुसार विहित करण्यात आलेली बिंदू नामावली सुधारणा करून भरती करण्याची यावी अशी मागणी कुणाल पवार यांनी केली आहे.
सोबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रश्न विभाग शासन क्रमांक बीसीसी 21. प्रक 75. 16 क मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई. दि.27 फेब्रुवारी . 2024 अध्यादेश राष्ट्रवादी चे सरचिटणीस कुणाल पवार यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवले आहे.