मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांच्या सुरक्षेबाबत उद्या दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ते दिल्लीला रवाना झाले आहेत. तेथे ते गृह खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली असता यावर त्यांनी मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं म्हटलं होत. दरम्यान दिल्लीला होणाऱ्या उद्याच्या बैठकीपूर्वी देखील शरद पवारांना महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. मात्र याआधीच्या केंद्राच्या सुरक्षेवरून शरद पवारांनी कदाचित केंद्राला अचूक माहिती घ्यायची असेल अशी संशय निर्माण करणारे वक्तव्य केले होते. दरम्यान नुकतीच मोहन भागवत यांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. आता दिल्लीत होणाऱ्या उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सुरक्षेबाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान Z+ सुरक्षा यात एक पोलीस अधिकाऱ्यासह दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. पहिल्या घेराव्यास एनएसजी जबाबदार आहे. दुसरा थर एसपीजी कमांडोद्वारे ठेवलेला आहे.त्यात आयटीबीपी आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे. एस्कॉर्ट आणि पायलट वाहनांची सुविधा देखील दिली जाते. दरम्यान गृह खात्याकडून मंत्री अमित आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना विशेष सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.