नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. काल शनिवारी कोळदे गटातून आमदार डॉ विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित तर कोपरली गटातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नंदुरबार तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११ गटांची पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुका होतात की नाही याबद्दल संभ्रम आहे. असे असले तरी राजकीय आखाडा तयार होऊ लागला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटातून आ.डॉ.विजयकुमार गावीत यांची द्वितीय कन्या तथा खा.डॉ.हिना गावीत यांची लहान बहिण डॉ.सुप्रिया गावीत यांनी कोळदे गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून राजकारणात एन्ट्री केली आहे . त्यांनी आज भाजपातर्फे दोन नामनिर्देशपत्र दाखल केले. तसेच डॉ.सुप्रिया गावीत यांनी खापर गटातुनही नामनिर्देशपत्र दाखल केले दाखल केली.त्या नेमक्या कोणत्या गटातुन लढतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातुन त्यांची राजकीय एन्ट्री झाली हे मात्र निश्चीत.
दरम्यान शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपूत्र ऍड.राम रघुवंशी या जिल्हा परिषदेच्या कोपर्ली (ता.नंदुरबार) गटातून निवडून आले होते. मात्र न्यायालयाचा निकालानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. आज दि. ३ जुलै रोजी त्यांनी कोपर्ली गटातून शिवसेनेतर्फे दोन अर्ज दाखल केले.
दरम्यान या पोटनिवडणुकीत मावळत्या काही भाजपा सदस्यांना ब्रेक मिळणार आहे, त्यामुळे नाराजी नाट्य देखील सुरू होणार असून तिकीट न मिळालेले सदस्य आता काय भूमिका घेणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.