मुंबई : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्यानुसार ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare)विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. या निवडणुकीसाठी त्या पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ निवडणार असल्याचा देखील चर्चा सध्या सुरू आहेत. कारण गणेश उत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मतदारसंघात लावलेल्या या पोस्टरवर सुषमा अंधारे यांचा मोठा फोटो वापरण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आल आहे.
या मतदारसंघातील लावण्यात आलेल्या पोस्टरवर “उच्चशिक्षित निर्भीड कणखर व्यक्तिमत्व वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय” असा मजकूरही लिहण्यात आला आहे. या मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना विजय अत्यंत सोपा मानला जात आहे.सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार आहेत. या मतदारसंघातील जागा महायुतीमध्ये अजित पवार गटाला सुटेल असं मानलं जात आहे. पण दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा ठोकला आहे. आता दोन्ही पक्षाकडून दावा केल्यानंतर या जागेवरचे दावेदार ही समोर यायला लागले आहेत.. त्यानुसार आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे देखील आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याचं बोललं जात आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडावा, अशी मागणी तेथील स्थानिक नेत्यांकडून होत आहे.करत थेट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाच या विधानसभा मतदारसंघातून उतरवण्याची तयारी स्थानिक शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मतदारसंघात सुषमा अंधारे यांचे पोस्टर्सही झळकले आहेत. त्यामुळे यावर ठाकरे गट काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.