राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar ) मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार कंबर कसली असून आता ते अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात पिंपरी चिंचवड मध्ये नाव डाऊन टाकण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये चिंचवड मधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे अडकण्याची शक्यता आहे. लवकरच ते तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटाला चांगलाच धक्का बसणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील नेत्यांची आउटगोइंग आणि इनकमिंग सुरू झाली आहे.अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली असून विधानसभा निवडणुका लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.अजित दादांना ही त्यांनी आता माघार नाही, असं स्पष्टपणे कळवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला रामराम करून ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार हे उघड आह. म्हणूनचं नाना काटे तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. तूर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत, मात्र जागा घड्याळाला सुटली तरी मी चिन्हावरचं ही निवडणूक लढणार असं म्हणत नानांनी संभ्रमावस्था वाढवलेली आहे.त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.