राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांनी आता विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत.येत्या दोन महिन्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील असे त्यांनी सांगितले आहे.
लोकसभेप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी ही सध्या महायुती आणि महाविकासाआघाडी या दोन्हीही पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. तसेच या दोन्ही पक्षांकडून मतदारसंघांच्या चाचपणीही केल्या जात आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संकेतानंतर आता
राजकीय पक्षातील हालचालींना वेग आला आहे.
आता नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका कार्यक्रमादरम्यान निवडणुकांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. चांदिवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणुकांबद्दल वक्तव्य केले आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार याची सर्वांनाच लागलेली उत्सुकता आता संपली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगला दणका दिला होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे