राजमुद्रा :
गेल्या दोन वर्षात दूध संघात झालेल्या भ्रष्टाचारास फक्तमाजी खासदार उन्मेश पाटील व संचालक प्रमोद पाटील आहेत. तसेच भ्रष्टाचार करण्यात उन्मेष पाटील शिरोमणी नंबर एक असल्याचा पलटवार जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.तसेच बोलबच्चनगिरी व शब्दांचा खेळ करण्यात पटाईत असणारे उन्मेष पाटील यांची विश्वासार्हता सर्व जिल्ह्याला माहिती आहे असेही ते म्हणाले आहेत.
तसेच दूध संघांवर आरोप करणारी पत्रकार परिषद हा त्याचाच एक नमुना असून अर्धवट माहिती दातांत खोटे आरोप व जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भेसळ व इतर मुद्द्यांवर दूध संघाची बदनामी केली म्हणून पुढील काळात विक्रीवर त्याची दुरोगामी परिणाम होणार आहेत. उन्मेष पाटील व प्रमोद पाटील यांनी राजकारण करताना दूध संघाच्या हिताचाही विचार करावा, आपल्या राजकीय वैयक्तिक स्वार्थासाठी दूध संघाच्या विश्वासार्थाबाबत खोटी माहिती पसरू नये. आजपर्यंतच्या इतिहासात दूध संघाच्या दुधात भेसळ झाल्याबाबत साधा आरोप देखील कोणीही केला नाही अगदी स्पर्धकांनी देखील नाही. यासोबतच दूध संघाचा ताळेबंद दूध संघाच्या विद्यमान संचालकाच्या उपस्थितीत वाचला जातो ही बाब गंभीर आहे.
गेल्या दोन वर्षात दूध संघात मंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, मंत्री अनिलदादा पाटील व सर्व ज्येष्ठ संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे काम करत मागील कार्यकाळातील नऊ कोटींचा तोटा भरून काढत यावर्षी नऊ कोटींचा निव्वळ नफा दूध संघाने मिळवला आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दरवाढ संदर्भात बैठक लावून देखील प्रश्न मार्गी लावला आहे,हे सर्व दूध उत्पादक व शेतकरी वर्गाला माहित आहे. मात्र येत्या ५ तारखेला वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांच्या बोनस बाबत मोठा निर्णय होणार असल्याची चाहूल उन्मेष पाटील यांना लागल्याने याचे श्रेय विद्यमान संचालक मंडळाला जाईल या भीतीने त्यांनी पत्रकार परिषद घेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र सभासद सुज्ञ आहे त्यांना यामागील सर्व राजकारण समजत असल्याने ते या बोलबच्चन गिरीला बळी पडणार नाहीत हा विश्वास असल्याची प्रतिक्रिया मंगेश चव्हाण यांनी केली आहे.