राजमुद्रा : संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपती बनवण्यासाठी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली होती. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून श्री गणेशाच्या पर्यावरण पूरक अशा शाडू मातीच्या मूर्ती साकारल्या.गेल्या पाच वर्षापासून ही कार्यशाळा घेतली जाते. दरवर्षी साजरा होणारा गणपती उत्सव हा पर्यावरण पूरक असावा या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन श्री गणरायाच्या शाडू मूर्ती बनवल्या.
मुलांच्या संस्कारक्षम वयामध्ये जर त्यांच्यावर चांगले विचार रुजवता आले तर ते नेहमीच फायद्याचे ठरतात.शाडूची माती नैसर्गिक व पर्यावरण पूरक असल्याने ह्या पासून बनवलेले गणपती लवकरात लवकर पाण्यामध्ये विरघळतात.. शाडू माती बरोबरच मोठ्या प्रमाणात लोह असणाऱ्या लाल मातीचे गणपती गाईच्या शेणापासून बनवलेले गणपती , त्याचबरोबर कागदाचा लगदा व शाडूची माती ह्याचे गणपती हे बऱ्याच अंशी पर्यावरणासाठी फायद्याचे आहेत .आपण जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती वापरतो ते विसर्जनानंतर लवकर पाण्यात विरघळत नाहीत.त्याचबरोबर हे गणपती रंगवताना जे रासायनिक रंग वापरले आहेत, त्यामुळे पाण्यातील जैवविविधतेवर वाईट परिणाम होताना जाणवतात म्हणून शक्यतो शाडू किंवा लाल मातीचे बाप्पा घरी आणावेत अशा सूचना मुलांना दिल्या.
तसेच थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर आपण गणपती उत्सवामध्ये करू नये अशा प्रकारचे आवाहन मुलांना केले गेले व त्याचे दुष्परिणाम मुख्याध्यापक मुकेश नाईक सर यांनी समजावून सांगितले .याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षकांचे अनमोल सहकार्य लाभले