राजमुद्रा : लाडक्या बाप्पाचा आगमन होत असल्याने या गणेशोत्सवाची तयारी राज्यात जोरदार सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवरच ग्राहकांसाठी आनंदवार्ता आली आहे.या गणेशोत्सवापूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली असून ग्राहकांचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे.आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,295, 23 कॅरेट 71,010, 22 कॅरेट सोने 65,306 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,471 रुपये, 14 कॅरेट सोने 41,708 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 81,337 रुपये इतका झाला आहे. त्यामुळे ग्राहकांची सोने खरेदीसाठी बाजारपेठात जोरदार गर्दी जमली आहे.
गेल्या महिन्यात 28 ऑगस्ट रोजी सोने वधारले होते. 220 रुपयांनी सोन्याची किंमत वधारली होती. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याला भरारी घेता आलेली नाही. या दरम्यान 30, 31 ऑगस्ट, 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी किंमतीत घसरण झाली. 1 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. 2 सप्टेंबर रोजी किंमती 270 रुपयांनी उतरल्या. तर 5 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,830 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर 27 ऑगस्टला चांदीच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर चांदीची चमक फिक्की पडली. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी मिळून चांदी 1500 रुपयांनी उतरली. सोमवारी भाव स्थिर होता. 2 आणि 4 सप्टेंबर रोजी चांदीत एकूण 2 हजारांची घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.
लाडक्या बाप्पाचं आगमन होत असल्याने बाजारपेठा सजल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी धातूच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.