राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी मतदारसंघातून दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. तसेच शरद पवारांच्या पक्षात येणाऱ्या नेत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकताच सोलापुरात राजकीय दणका महाविकास आघाडीने (MVA)महायुतीला(Mahayuti )दिला आहे. विधानसभेच्या तोंडावर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीत मोठे खिंडार पडले आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे.
टेभुर्णीच्या सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला आहे.त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगलाच दणका दिला होता. आता आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही राजकीय नेत्यांचे होणारे इनकमिंग महाविकास आघाडीची ताकद वाढवणार आहे