राजमुद्रा : राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
(Raj Thackeray)सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मोर्चे बांधणीसाठी जोरदार कंबर कसली असून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला (Uddhav Thackeray group )मोठा धक्का दिला आहे.वरळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुतकर यांचे खंदे समर्थक अमित मटकर आणि हरीश जावळेकर यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला आहे. यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि वरळीतील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाला विधानसभेच्या तोंडावर धक्का दिला आहे.
मनसेने वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.काही दिवसांपूर्वी मनसेच्या 16 संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली होती. मनसेने 2009 मध्ये 230 ते 250 जागा लढवल्या होत्या. आता येत्या निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागा लढवणार आहे. यासाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करत आहे.
मनसेच्या 16 संभाव्य उमेदवारांची नावे
1) शिवडी – बाळा नांदगावकर 2) भायखळा – संजय नाईक 3) वरळी – संदीप देशपांडे 4) माहीम – नितीन सरदेसाई 5) चेंबूर – माऊली थोरवे 6) घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल 7) विक्रोळी – विश्वजित ढोलम 8) मुलुंड – सत्यवान दळवी/राजेश चव्हाण 9) भांडुप – शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर 10) कलिना – संदीप हटगी/संजय तुरडे 11) चांदिवली – महेंद्र भानुशाली 12) जोगेश्वरी – शालिनी ठाकरे 13) दिंडोशी – भास्कर परब 14) गोरेगाव – वीरेंद्र जाधव 15) वर्सोवा – संदेश देसाई 16) मागाठणे – नयन कदम