राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) मुंबई मतदारसंघासाठी जोरदार कंबर कसली आहे.मुंबई हा आपला बालेकिल्ला असल्याचं शिवसेना ठाकरे गटाने वेळोवेळी सांगितलं आहे.या पार्श्वभूमीवरच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena) मुंबईतील (Mumbai News) संभाव्य 22 उमेदवार ठरले आहेत. यामध्ये विनोद घोसाळकर दहिसर, किशोरी पेडणेकर भायखळा, वांद्रे पूर्व वरूण सरदेसाईचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यापैकी मागील लोकसभा निवडणुकीत 14 जागा ठाकरेंनी जिंकल्या होत्या. शिवसेनेने मागील निवडणुकीत एकूण 56 जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता पक्ष फुटीनंतर आमदार हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विभागले गेले आहेत. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंसोबतच ठाकरेंसाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे.महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही एकत्रच सामोरं जाणार आहे. अजून जागावाटप निश्चित झालं नसलं तरी, सर्व पक्ष आपआपली संभाव्य यादी तयार करत आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभेसाठी ठाकरे गटाचे 22 शिलेदार ठरले असून त्याची संभाव्य यादी पुढील प्रमाणे –
1. विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी : ठाणे
2. विनोद घोसाळकर : दहिसर
3. सुनिल प्रभू : दिंडोशी
4. अमोल किर्तीकर/ बाळा नर/ शैलेश परब : जोगेश्वरी
5. ऋतुजा लटके : अंधेरी पश्चिम
6. राजू पेडणेकर/ राजूल पटेल : वर्सोवा
7. वरूण सरदेसाई : वांद्रे पूर्व
8. विशाखा राऊत/ महेश सावंत : दादर-माहिम
9. अजय चौधरी/ सुधीर साळवी : शिवडी
10. आदित्य ठाकरे : वरळी
11. किशोरी पेडणेकर/ जामसूतकर/ रमाकांत रहाटे : भायखळा 12. ईश्वर तायडे : चांदीवली
13. अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर : चेंबुर
14. रमेश कोरगांवकर : भांडुप
15. सुनिल राऊत : विक्रोळी
16. संजय पोतनीस : कलिना
17. विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे : अणुशक्तीनगर 18. सुरेश पाटील : घाटकोपर
19. प्रविणा मोरजकर : कुर्ला
20. निरव बारोट : चारकोप
21. समीर देसाई : गोरेगाव
22. श्रद्धा जाधव : वडाळा