राजमुद्रा : नुकत्याच झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीनंतरशिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादातून खटक्यावर खटके उडाले.बॅनरवर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना असे न लिहता केवळ लाडकी बहीण योजना असे छापले जात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीवर मंत्रिमंडळ बैठकीनंतर केला.
दोन पक्षात चांगलाच वाद रंगला. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला असला तरी महायुतीमध्ये वारंवार होणारा वाद चिंतेत वाढ करणारा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे नाव काढून दादाचा वादा असे श्रेय कसे काय घेतले जात आहे, असा आरोप यावेळी शिंदे गटातील मंत्र्यांनी केला. त्यानंतर या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन तोडगा काढला. या योजनेचे कोणी एकाने श्रेय घ्यायचे नाही, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वच स्थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने एकीकडे राज्यात चांगले वातावरण आहे. या योजनेचा महायुती सरकारला फायदा होईल, असे चित्र आहे.
दुसरीकडे पुन्हा या प्रकरणावरून शिंदे गट (Shinde Group )व अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या प्रवक्त्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे