राजमुद्रा : लोकसभेप्रमाणेच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आमदार एकनाथ खडसे यांनी महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार यावं, असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
.आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे.महायुती सरकार आल्यापासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुध्दीने ईडी सीबीआय सारख्या कारवाया करत आहेत. उट्टे काढण्याचं काम करत असल्याने जनतेची कामं होत नाहीत. असा हल्लाबोल महायुतीवर एकनाथ खडसेंनी चढवला आहे.या योजनेला आपला विरोध नाही मात्र इकडे केलेला खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे, एवढाच खर्च जर धरणे उभारणी ,रस्ते निर्मिती साठी केला गेला तर त्यातून रोजगार ही निर्माण होऊ शकणार आहे, त्यासाठी ही प्रयत्न करायला हवं, असं एकनाथ खडसे म्हणाले.
दरम्यान दुसरीकडे आपल्या भाजप प्रवेशाला माहितीतील नेते जबाबदार असल्याचे वक्तव्य ही त्यांनी केल आहे. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादी जाणार की राहणार याबाबत अजून सम्रावस्था आहे.