राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उतरत आहे.मात्र महायुतीने मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतर ठरवण्याचं सूत्र निश्चित केल्याची माहिती आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके (Parinay Fuke)यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत तरी ते ही एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार, फडणवीस यांचं महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहेत. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला. तर फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असे परिणय फुके म्हणाले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागा वाटपांच्या चर्चेच्या फेऱ्या आहेत. लोकसभेप्रमाणे यंदाही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगणार आहे.या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा फुकेनीं बोलून दाखवली आहे