राजमुद्रा : आगामी विधानसभेच्या तोंडावर पूर्व विदर्भात भाजपला (BJP)मोठा धक्का बसला आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने जिल्ह्यातील आणि गोंदिया शहरातील विकास कामे मार्गी न लागल्याने नाराज असलेले गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agarwal) यांनी शेवटी भाजपाला रामराम ठोकला आहे . येत्या 13 सप्टेंबरला ते काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथाल्ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यासह दिग्गज नेत्यांचे उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे.
…गोंदिया जिल्ह्यात आज काँग्रेसकडून 2 वेळा विधानपरिषद तर 3 वेळा विधानसभा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी अखेर आज पत्रकार परिषद घेत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. मात्र 2019च्या निवडणुकीदरम्यान त्यांनी मोदी लाटेत भाजप प्रवेश केला होता. त्यांना भाजपने उमेदवारी ही दिली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपात अस्वस्थ होते.त्यानंतर आता भाजपला रामराम करून ते लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत…
.विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एक माजी आमदार आणि भाजपला सोडचिट्टी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का समजला जात आहे