राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शव भूमीवर महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका आता होमगार्डनां बसला आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वित्त विभागाकडे आलेले अनेक प्रस्ताव पुढे ढकलले जात आहेत किंवा त्याला स्थगिती दिली जात असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळेच ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली आहे. तशा आशयाचं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
.राज्यातील होमगार्ड सेवेच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्याची वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, युवा, मागास वर्ग आणि समाजातील सर्व दु्र्बल घटकांना आर्थिक मदत व प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यावरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गृह विभागाने होमगार्ड महासमादेशक यांच्या नावाने दिलेले 1 ऑगस्ट रोजीचे एक पत्र समोर आलं आहे. त्यामध्ये होमगार्डच्या विविध भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव स्थगित करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
…या योजनामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुनदानानंतर आता होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशा असंख्य सरकारी योजना, भत्ते अन कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असतील. फक्त मतांसाठी आणलेल्या योजनांमुळे, सरकारी दीड हजारात मत विकत घ्यायची योजना, हे फक्त महायुतीचे जनतेला निवळ फसवण्याचे काम आहे असे स्पष्ट दिसून येते.…