राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहेत. त्यातच राजकीय नेत्यांकडून विविध जागांवर दावेदारी सुरु आहेत. आता शिवसेना शिंदे गटाने नाशिक विधानसभा मतदारसंघावर (Nashik Central Assembly Constituency) दावा केला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी थेट उमेदवाराचे नाव जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
नाशिक विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे (Devyani Pharande) या सलग दोन टर्मपासून आमदार आहेत. मात्र आता संजय शिरसाट यांनी अजय बोरस्ते यांचे नाव जाहीर केल्याने महायुती मिठाचा खडा पडण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे
यादरम्यान आता जागावाटपावरून महायुतीत ठिणगी पडणार आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. अमित शाह यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीमधील मित्र पक्षांच्या नेत्यांना जागावाटपात सन्मानजनक जागा देण्याचा शब्द अमित शाहांनी दिल्याचे समजते.