राजमुद्रा : चाळीसगाव येथील भूमिपुत्र दिग्विजय पाटील यांनी जागतिक पातळीवर नाव केले आहे.ते सध्या कझाकस्तानमधील भारतीय दूतावासात द्वितीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 18 ऑगस्टला जर्मनी (फ्रैंकफर्ट) येथे झालेली आयर्नमॅन शर्यत पूर्ण करून इतिहास रचला आहे. आयर्नमॅन रेस पूर्ण करणारे ते प्रथम आयएफएस अधिकारी ठरले आहेत.
आयर्नमॅन फ्रैंकफर्ट ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक ट्रायथलॉन स्पधपैिकी एक आहे, जी जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंना आकर्षित करते. ज्यात ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी मॅरेथॉन पळणे समाविष्ट आहे, जी १५ तासांच्या कठीण वेळेत पूर्ण करायची असते. कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे २०२२ मध्ये आयर्नमॅन शर्यत झाली. मुसळधार पावसामुळे पोहण्याचा भाग थंड आणि सायकलिंगचा भाग खडतर झाला असतानाही पाटील यांनी १४ तास २२ मिनिटांत शर्यत पूर्ण केली. आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या पाटील यांनी नेहमीच आपल्या कठोर राजनेयिक कारकिर्दीचा आणि वैयक्तिक तंदुरुस्तीचा समतोल साधला आहे. दिग्विजय यांनी या स्पर्धेची तयारी एप्रिल २०२३ मध्ये सुरू केली. तीन महिन्यांच्या सरावानंतर त्यांनी जुलै २०२३ मध्ये कझाकस्तानच्या अस्ताना येथे झालेल्या हाफ आयर्नमॅन शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली. या वर्षी त्यांनी अलमाटी, कझाकस्तान येथील कापचगाय तलावात १० किमी स्वीमिंग करून ओशनमॅन हा किताबही प्राप्त केला.
दिग्विजय पाटील यांनी २०१९ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) मध्ये प्रवेश केला आणि २४ व्या वर्षी युपीएस्सी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या ते कझाकस्तानमधील भारतीय दूतावासात द्वितीय सचिव म्हणून कार्यरत आहेत, जेथे ते भारत आणि कझाकस्तान यांच्यातील राजकीय आणि आर्थिक संबंध सांभाळत आहेत. आज त्यांच्या कठोर मेहनतीने चाळीसगावचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे चाळीसगावचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस दिग्विजय पाटील यांची इतिहासाला दखल घेतली जाईल. यात शंका नाही.
लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी 23 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेपासून गिरणेच्या प्रवाहात कमरे बरोबर पाण्यात अर्धनग्न जलसमाधी आंदोलन सुरू केले. यात त्यांच्या सोबत टप्प्याटप्प्याने कार्यकर्ते सहभागी झाले. नार पार योजना रद्द करुन गिरणा खोऱ्यावर अन्याय केल्याची भावना त्यांनी आंदोलनात बदलली. खान्देशवासियांचे हक्काचे 30 TMC पाणी मिळावे यासाठी त्यांनी केलेले आंदोलन देशाला दिशादर्शक ठरले. माञ गिरणापुत्र उन्मेश पाटील यांनी मागण्या मान्य होई पर्यंत जलसमाधी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला.
रात्री दोन वाजता शासकीय वैद्यकिय अधिकारी यांनी उन्मेश पाटील यांची प्रकृतीची तपासणी केली. सलग पाण्यात राहिल्याने हातपाय पांढरे पडले आहेत. त्यांना लवकरात लवकर आंदोलन थांबवायला लावावे अशी सूचना प्रशासनाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. वरिष्ठांना अहवाल पाठविला. तोपर्यंत सकाळचे पाच वाजले होते. दिवस उजाडला तसा कार्यकर्त्यांच्या गाड्या भरून यायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता हजारों जलप्रेमींनी रास्ता रोको करीत आंदोलनास पाठिंबा दिला. तोपर्यंत जिल्हाभरातून, राज्यभरातून जलसिंचन अभ्यासक, नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीचे पाठीराखे यांचे विनंतीचे फोन सुरु झाले.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आंदोलन थांबविण्यासाठी मध्यस्थी करावी हा रेटा सुरु झाला*.एकीकडे रास्ता रोको आंदोलन उग्र स्वरूप धारण करत असताना उन्मेश पाटील यांच्या प्रकृतीच्या चिंतेने कार्यकर्ते भडकले होते. तोपर्यंत सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाने हे आंदोलन देश पातळीवर पोहचविले होते.अखेर तिन वाजता मा.पालकमंत्री आणि मा.जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलन थांबविण्यात आले.तोपर्यंत या आंदोलनाने जागतिक पातळीवर एक नवा किर्तिमान नोंदविला गेला.