राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट जोमाने तयारी लागला असून जनसन्मान यात्रेतून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे.
गेल्या काही दिवसापासून अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून (Baramati) निवडणूक लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार बारामतीतुनच विधानसभा निवडणूक लढतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
अजित पवार यांनी म्हटलं होतं की ते, बारामती मधून विधानसभेचे निवडणूक लढणार नाही, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांना आग्रह केल्यानंतर अजित पवार हे बारामतीतूनच निवडणूक लढतील, असे ते म्हणाले. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्व पटेल यांच्या बालेकिल्लांमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज यात्रेचे आगमन झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. होती. आता यावर जयंत पाटील यांनी अजित पवारच विधानसभा बारामती लढतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.