राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार कंबर कसली असून या निवडणुकीसाठी आघाडी कडून तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तसेच तीन बैठकांमध्ये 125 जागांवर सहमती झाल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. उर्वरित जागांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या विधानसभेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यातील जनतेने महायुती सरकारला नाकारले आहे.लोकसभा निवडणुकीत ते चांगले दिसून आले आहे. महायुतीची आणि आमची तुलना करू नका… येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळणार असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे यावेळी महायुतीलाही चांगला फटका बसणार की काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार महायुती सामील झाले. त्यांची भूमिका चुकीची होती. महाराष्ट्र आणि बारामतीच्या जनतेला देखील त्यांची ही भूमिका आवडली नाही. त्यामुळेच निनावी कार्यकर्त्याने प्रातिनिधिक पत्र पाठवले असेल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. दरम्यान दुसरिकडे महायुतीही चांगलीच तयारीला लागली आहे.
निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महायुतीत सतत वादावाद होत असते. पण आमच्या आघाडीत नेहमी मैत्रीपूर्ण चर्चा होत असते. या विधानसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडी बाजी मारणार असेही थोरात म्हणाले.