जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | सुट्टीच्या काळातील शालेय पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीयीकृत बँक झिरो बॅलन्स वर खाते उघडत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दमछाक होत आहे. परिणामी दीडशे रुपयासाठी विद्यार्थ्यांचा पाचशेचा भुर्दंड सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या शालेय विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहारासाठी खाती मोफत उघडण्याची तयारी दर्शवली आहे. अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकार्यांना तसा प्रस्ताव दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.