राजमुद्रा :जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृह येथे झालेल्या आंतर शालेय जळगाव मनपास्तरीय एकोणावीस वर्षातील बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली व स्पर्धेत एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या. या आंतरशालेय मनपा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात मुलांमध्ये सेंट टेरेसाचा आरव सेठीया ३.५ गुणांसह तर मुलींमध्ये एमजी कॉलेजची निधी जैन ४ गुणांसह बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत एकूण १९ वर्षे वयोगटात ४० खेळाडूंचा सहभाग होता.
या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक स्पर्धेत प्रथम ५ आलेल्या मुलं आणि मुलींना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पदक देण्यात आली तसेच या प्रथम पाच व मुलं आणि मुलींची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आली विजय खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव शकील देशपांडे, संजय पाटील प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे,संजय पाटील, प्रशांत पाटील होते.विजयी खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली.
१९ वर्षाखालील विजयी मुलांमध्ये आरव उमेशकुमार सेठीया सेंट टेरेसा ज्युनिअर कॉलेज, अनिकेत गुलाब पाटील धनाजी नाना जुनियर कॉलेज, यश सोमनाथ पाटील सेंट टेरेसा ज्युनिअर कॉलेज, प्रेम विनोद पाटील बाहेती कॉलेज जळगाव, श्रेयस योगेश शुक्ला एम जे कॉलेज
यांचा समावेश आहे.
19 वर्षाखालील मुलीमध्ये निधी राकेश जैन एम जे कॉलेज,
श्रावणी किरण नेमाडे एम जे कॉलेज,विना दीपक गिरणारे एम जे कॉलेज, हंसिका भूषण दहाड सेंट टेरेसा, श्रावणी मनोज पाटील सेंट टेरेसा यांचा समावेश आहे.