राजमुद्रा : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अडकलेले आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal )यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. यामुळं केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. यावरुन सीबीआयने त्यांना अटक केली होती. यानंतर केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मिळण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. अखेर आज केजरीवालांना जामीन मंजूर झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांसाठी जामीन देण्यात आला होता. प्रचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा तरूंगात जावे लागले होते. आता त्यांना रितसर जामीन मिळाला आहे.अरविंद केजरीवाल हे जवळपास 177 दिवसानंतर तुरूंगाच्या बाहेर येणार आहेत. शिवाय त्यांना 10 लाखाच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याप्रकरणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांचे खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे.