राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना शिंदे गट आणि अजित पवार गटात (Ajit Pawar Group )नाराजीचे सुर असल्याच्या चर्चा होत आहेत.अशातच आता धाराशीवमधील शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant )यांच्या परांडा मतदारसंघातील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेला अजित पवार गट नाराज असल्याच्या चर्चाना उधाण आल आहे.
लाडकी बहिण योजना सुरु झाल्यापासून सरकारी कार्यक्रमाला अजित दादांनी आज पहिल्यांदा गैरहजेरी लावली. याआधी जेव्हा अमित शाहा मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हाही अजित पवारांची गैरहजेरी होती. दरम्यान मंत्री तानाजी सावतांच्या कार्यक्रमाला नियोजितकार्यक्रमानुसार मुख्यमंत्री शिंदे(Ekanath shinde )आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला हजर राहणार होते. मात्र जे.पी.नड्डांच्या मुंबई दौऱ्यावर फडणवीस कार्यक्रमाला आले नाहीत. तर अजित पवार पुण्यात व्यस्त होते. त्याबद्दलचा खुलासा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना केला.त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुतीचा घटक पक्ष असलेला अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यामधील दरी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एक वक्तव्य केले होते. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडली होती. मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी सभेत केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते ही चांगलेच आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. या सगळ्या पार्शवभूमीवर अजितदादा कार्यक्रमाला हजर राहिले नसल्याच्या चर्चाना उधाण आल आहे.