राजमुद्रा : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal )यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर आता त्यांनी केलेल्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका सभेत बोलताना त्यांनी मी दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी मोठी घोषणा केली आहे.. तसेच येत्या दोन दिवसांत विधीमंडळाची पक्षाची बैठक होईन, त्यात नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने एक कायदा, दुसरा कायदा असे अनेक कायदे करत माझे अधिकार काढून घेतले. पण मी तुमची काम बंद केलेली नाही. माझ्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे आणि तो मी कमावला आहे. जर केजरीवाल प्रामाणिक आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर मला भरघोस मत द्या. म्हणजे मी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर जाऊन बसेन असेही ते म्हणाले.
राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना दिल्लीत मात्र अरविंद केजरीवांलाच्या घोषणेने भूकंप आला आहे. मी दोन दिवसांनंतर माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईल. तोपर्यंत माझ्याऐवजी आप पक्षाचा दुसरा नेता मुख्यमंत्री होईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे
.