राजमुद्रा : महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 9 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यांमध्ये लागू केली. या पार्शवभूमीवर योजनेअंतर्गत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते 176 उमेदवारांना जिल्हा परीषद शाळांमध्ये प्रशिक्षण घेणे बाबत आदेश दिले गेले.
.या योजनेसाठी शिक्षण विभाग पंचायत समिती चाळीसगाव अंतर्गत 187 जिल्हा परिषद शाळांसाठी 176 उमेदवारांची निवड केलेली आहे.प्राधान्याने बी एड, डीएड,पदविकाधारक अशा क्रमाने मेरिटनुसार ही उमेदवार सिलेक्ट केलेले आहेत. 187 जागांसाठी तब्बल 300 अर्ज आलेले होते. 06 महिन्याचा हा प्रशिक्षण कार्यक्रम असून याचा लाभ प्रत्येक पात्र उमेदवाराला मिळणार आहे. यासाठी वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातील बारावी पास, आयटी आय,पदविका,पदवी, पदव्युत्तर शिक्षण झालेली व महाराष्ट्र राज्याची रहिवासी असलेल्या उमेदवार या योजनेत सहभागी झालेले आहेत
आपल्या समाजात शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
हा प्रशिक्षण कालावधी जरी असला तरी आपण शिक्षक म्हणून फक्त एका वर्गाचे शिक्षक नसून, आपण संपूर्ण समाजाचे शिल्पकार रहाणार आहात. हि नियुक्ती जरी 6 महिन्याची असली तर याचा उपयोग आपली कौशल्य विकसित करताना नक्कीच होवू शकेल असे मनोगत आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी या प्रसंगी व्यक्त केले.प्रशिक्षण आदेश देणे प्रसंगीच्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी श्री. नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी श्री. विलास भोई हे उपस्थित होते.