राजमुद्रा : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar )यांनी शिंदखेड्यात शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती (Mahayuti )सरकारला चांगलाच टोला दिला आहे. या योजनेतून सरकार महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देत आहे. पण आताच्या काळात या बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे सरकारचे लक्ष नाही, असा जोरदार टोला त्यांनी सरकारला लगावला.
तसेच सरकारच्या सरकारच्या शेती धोरणावर बोलताना ते म्हणाले, आताच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची आस्था नाही . आपण दहा वर्ष कृषी विभागाचे काम करत होतो, तेव्हा देश अन्नधान्यसंदर्भात स्वयंपूर्ण
होता. पण या मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. कांद्याला भाव पण मिळाला नव्हता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतले. त्यानंतर निर्यात बंदी करण्यात आली. गहू, तांदुळावर बंदी घातली. जे, जे तुम्ही पिकवता त्यावर निर्यात बंदी केली. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. दहा वर्ष म्हणून मी शेतीचे जे काम केले त्यामुळे जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणारा देशात भारत पहिल्या नंबर वर होता. असेही ते म्हणाले.
महायुती सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे त्यामुळे त्यांचा माज उतरवला पाहिजे… या सरकारला खड्ड्यासारखे बाजूला काढा ही संधी या निवडणुकीत तुम्हाला आहे असा हल्लाबोल शरद पवारांनी महायुती सरकारवर चढवला. दरम्यान दुसरीकडे राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना पुन्हा आपले सरकार येण्यासाठी महायुती जोराने कामाला लागली आहे.