राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी केली असून आता ठाकरे घराण्यातील आणखी एक व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राजगडवर बैठक झाली. या बैठकीत मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काय भूमिका घेणार? त्याकडे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीसाठी मनसे नेते राज ठाकरे यांनी आतापर्यंत पक्षाचे तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात बाळा नांदगावकर (शिवडी), दिलीप धोत्रे (पंढरपूर), राजू उंबरकर (लातूर ग्रामीण-विदर्भ) यांचा समावेश आहे. एकूण २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता मनसेचे आणखी कोण कोणते नेते निवडणुकीच्या मैदानात उतरणार? हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाची स्थापना केली. त्यावेळी शिवसेना समाजकारणात होती. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे सूत्र होते. त्यानंतर शिवसेनेची वाटचाल हळूहळू राजकारणाकडे होऊ लागली. मग शिवसेनेच्या राजकारणाची सूत्र बाळासाहेब ठाकरे सांभाळू लागले. शिवसेना प्रमुखांनी स्वत: कधी निवडणूक लढवली नाही. शिवसेनेत उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या माध्यमातून थेट राजकारणात आले. परंतु ते निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही. मात्र, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांनी २०१९ मध्ये मैदान मारले.