राजमुद्रा : केंद्र सरकारने लहान मुलांसाठी आता नवी योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लहान मुलांचे आर्थिक भवितव्य आता सुरक्षित होणार आहे.याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताामन (Nirmala Sitharaman) यांनी काही दिवसांपूर्वी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्प सादरीकरणारम्यान एनपीएस वात्सल्य योजनेची (NPS Vatsalya Scheme) घोषणा करण्यात आली होती. आता याच घोषणेची अंमलबजावणी केली जात आहे. येत्या 18 सप्टेंबर 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन ही योजना चालू करणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी पोर्टल लॉन्च केले जाणार आहे.
एनपीएस वात्सल्य योजना म्हणजे भारतीय पेन्शन पद्धतीत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. एनपीएस वात्सल्य ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाअंतर्गत (PFRDA) चालली जाणार आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांना आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणूनही ही योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत आई-वडिलांना आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्याची संधी मिळणार आहे
एनपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात दिल्लीतून केली जाईल. मात्र या योजनेच्या लोकार्पणासाठी देशभरात साधारण 75 ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.