राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना संगमनेर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात आता माजी खासदार सुजय विखे -पाटील(Sujay Vikhe) विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या विधानसभेसाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून ते आपले नशीब आजमावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नगर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्याच्यामुळे सुजय विखें पाटीलचा पराभव झाला असं म्हणून आता सुजय विखेंकडून त्यांना आव्हान उभं केलं जात आहे.यातून त्यांनी आता पक्षाकडे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे संगमनेर मतदार संघात हे विधानसभा निवडणूक चुरशीने होणार असे चित्र दिसून येत आहे.
सुजय विखे यांना या विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी त्यांचे वडील भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखेंनी पाठिंबा दर्शवला आहे.. ‘सुजय विखे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्याला जो निर्णय घ्यायचा, तो त्यानं घ्यावा, आम्ही त्याच्या निर्णयाबरोबर आहोत’, असं राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात थोरात यांच्यापुढे विखे पाटलांचा आव्हान असणार आहे.