राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar ) जोमाने मैदानात उतरले आहेत. अशातच शरद पवार चिंचवड विधानसभेत भाजपला (BJP )मोठा धक्का देणार. कारण त्यांच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का बसणार आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी शरद पवार यांच्यासोबत संवाद साधल्याची ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, भाजपकडून त्यांचे दिर आणि शहराध्यक्ष शंकर जगतापांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु आहेत. याची कुणकुण अश्विनी जगतापांना (Ashwini Jagtap) लागल्यामुळं त्या तुतारी फुंकू शकतात, अशी चर्चा शहरभर रंगलेली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अश्विनी जगताप यांनी ‘तुतारी’ हाती घेतली तर कुटुंबात लढत होणार आहे.. दीर आणि भावजय म्हणजेच अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यामध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे.यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोठे बदल होण्याची शक्यता आहे.