राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांची काँग्रेसमध्ये घर वापसी होताना दिसत आहे.नांदेडमधील बलाढ्य नेते आपल्या सूनेसह काँग्रेसमध्ये आज प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का बसणार आहे.तर दुसरीकडे भाजपचे नेते, खासदार अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव पाटील खतगांवकर हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन घरवापसी करणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठ खिंडार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळताच काँग्रेसला अच्छे दिन सुरू झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढली आहेविशेष म्हणजे खतगांवकर यांच्या सून मीनल खतगांवकर या सुद्धा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी हा प्रवेश सोहळा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. खतगांवकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास भाजप आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.
भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांची सून मीनल हे दोघेही आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे दोन्ही नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. तसेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मीनल या नायगाव विधानसभेवर दावा करू शकतात, अशी शक्यता आहे. खतगांवकर कुटुंबीयांसोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि अविनाश घाटेही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता सूत्रांनी दिली. दरम्यान विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.. यावर भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.