राजमुद्रा : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना पाठींबा मिळावा आणि गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी सुरु केलेल्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला वर्ध्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी योजना कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती देखील दिली. या योजनेतून एकट्या महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे.साडे सहा लाख कारागिरांना आधुनिक साधनं दिली आहे. त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही गॅरंटी शिवाय तीन लाखाचं कर्ज दिलं जात आहे. एक वर्षातच विश्मकर्मा भावा बहिणांना १४०० कोटीचं लोन दिलं आहे. प्रत्येक गोष्टीचं या योजनेतून ध्यान दिलं जात आहे. त्यामुळेच ही योजना यशस्वी होत आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार विश्वकर्मा योजनाचे सर्वाधिक लाभ एससी, एसटी आणि ओबीसी समाज घेत आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध योजनांचे लोकापर्ण केले. तसेच त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही योजना कशा पद्धतीने सुरु आहे, याबद्दलची माहिती दिली.
.
या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते. पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही योजना सुरु करुन एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने वर्ध्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.