राजमुद्रा :सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आज अचानक अमेरिकेतील एक कंपनी ‘रिपल लॅब’ची जाहिरात सलग चालू झाल्याचं काही युजर्सला पाहायला मिळालं , यामुळे सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाले असल्याचे समोर आले आहे. या युट्यूब चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP ची जाहिरातीचे व्हिडिओ दाखवले गेले. XRP क्रिप्टोकरन्सी यूएएस आधारित कंपनी आहे. XRP क्रिप्टोकरन्सी यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केली आहे. हॅकर्सना रोखण्यात युट्यूब अपयशी ठरल्याचा रिपल लॅब्स कंपनीने दावा केला आहे.
हॅकर्स सध्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लक्ष्य करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या युट्यूब चॅनेलवर अलीकडेच, कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी थेट प्रक्षेपित करण्यात आली होती. मात्र आता युट्यूबवर बनावट खाते उघडून सुप्रीम कोर्टाचे युट्यूब चॅनेल हॅक करण्यात आले आहे. शेवटच्या सुनावणीचा व्हिडिओ हॅकर्सनी प्रायव्हेट केला होता आणि ‘ब्रॅड गार्लिंगहाऊस: रिपल रिस्पॉन्स टू द एसईसी’च्या $2 बिलियन फाइन! एक्सआरपी प्राइस प्रीडिक्शन’ असे शीर्षक असलेला व्हिडीओ युट्यूब चॅनेलवर लाइव्ह केला.
. तत्कालीन न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत प्रमुख सुनावणीचे थेट प्रसारण करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत, सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये निर्णय घेतला की सर्व घटनापीठांच्या सुनावणी यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित केल्या जातील. 27 सप्टेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण पहिल्यांदाच झाले. जेव्हा तत्कालीन न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी 5 प्रकरणांमध्ये निकाल दिले होते.
आता सुप्रीम कोर्टाचं यूट्यूब चॅनल हॅक झाल्याने चर्चाना उधाण आलं आहे .