राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर मुक्ताईनगर मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर यांनी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर केलेल्या टीकेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. यावरूनच आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रूपाली चाकणकर यांच्या वक्तव्याचे समर्थन करत त्या ज्या बोलल्या ते वास्तव असल्याचं म्हटलं आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर यांनी काल रोहिणी खडसे यांच्यावर नावापुढे नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून मतदारसंघात फिरल्याशिवाय यांना कोणी ओळखते का? तसच वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्य किंमत देतो अशी टीका केली होती. या वादात आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उडी घेत चाकणकर यांच्या वक्तव्याचे समर्थन केल आहे.ते म्हणाले, त्या ज्या बोलल्या ते वास्तव आहे, वडिलांच्या जीवावर कर्तुत्व कमवण्यापेक्षा स्वतःच्या जीवावर कर्तुत्व सिद्ध कराव.तसं पाहिलं तर पुढाऱ्यांच्या घरात पुढारी तर सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं.त्यांना कधी संधी मिळणार यासाठी त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून संधी घ्यावी असे ते म्हणाले.
मुक्ताईनगरच्या दौऱ्यात रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे या वडिलांच्या कर्तुत्वावरच उभ्या असल्याची टीका करत सून एका पक्षात, लेक दुसऱ्या पक्षात असं म्हणत खडसेंना टोला लगावला.यावरून रूपाली चाकणकरांचा राजकारणातल अस्तित्व काय?त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून थांबवून स्वतःच्या घरातलं बघावं असा टोला खडसेंनी लगावला. त्यानंतर आम्ही सुरूवातीपासून घड्याळ या चिन्हासोबत आहोत, आम्ही कधीच पक्ष बदलला नाही, असा दावा रूपाली चाकणकर यांनी केला होता.दरम्यान रूपाली चाकणकर आणि खडसे यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे