राजमुद्रा ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील महायुतीच्या सरकारचे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे शिवस्वराज्य यात्रेची भव्य सभा घेतली . यावेळी | शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले ,आपल्या महाराष्ट्रातल चित्र जेवढं दिसतंय तेवढं चांगलं नाही ,.. हल्ली प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन स्वतःचे खिसे भरणारे लोकप्रतिनिधी दिसतात. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची सत्ताधाऱ्यांची तयारी आहे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सत्तेत जितके बसले आहेत, त्यांच्या आजूबाजूला जितके कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा मुख्य धंदा हा वाळू उपसा हाच आहे. सरकारचे यांच्यावर काहीच नियंत्रण नाही. का तर ते ह्यांचे बगलबच्चे आहेत, असे ते म्हणाले .
तसेच या तालुक्यात माजी आमदार राजीव दादा देशमुख यांनी अनेक कामे केली आहेत. एमआयडीसी सुरू केली. पाणी पुरवठा योजना आणली. वैयक्तिक स्वार्थ न ठेवता निरपेक्ष वृत्तीने जनतेसाठी कार्य केले. त्यामुळे आजच्या या सभेत निष्ठेने लोकं राजीव दादांसाठी उपस्थित आहेत. आताच्या सत्ताधार्यांनी निसर्गाला देखील ओरबडायचं यांनी सोडले नाही. सरकारी काम, सरकारी पैसे वापरून केले असताना आमदाराची संकल्पना असे लिहितातच कसे? त्यामुळे यांची प्रवृत्ती काय आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले .
वरखेडे धरणाच्या बॅक वॉटरने प्रभावित झालेल्या गावाचे पुनर्वसन करण्याचे काम महाविकास आघाडी काळात आपण मंजूर केलं. मात्र अजून कामाला सुरुवात झालेली नाही. महाराष्ट्र लुटून जगणारी जी जमात आहे तिला हिसका दाखवण्याची जबाबदारी आपली आहे.असे ही जयंत पाटील म्हणाले .