राजमुद्रा : दिपनगर प्रशासनाकडून सीएसआर फंडात दुजाभाव केल्याप्रकरणी वेल्हाळे, उदळी व जाडगाव या गावातील ग्रामस्थांनी दिपनगर प्रोजेक्ट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते .हे आंदोलन पाच तास चालले अखेर आमदार एकनाथराव खडसे यांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर दिपनगर अधिकाऱ्यांनी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे .
दिपनगर प्रशासनाकडून परिसरातील विविध गावांना सी एस आर फंडाची रक्कम दिली जाते या फंडाच्या रक्कम मध्ये विल्हाळे इतर काही गावांमध्ये दुजाभाव केल्याचे दिसून आले आहे . या कारणाने विल्हाळे येथील ग्रामस्थ व जाडगाव उदळी या गावातील सरपंच यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता . या आंदोलनामध्ये महिला आक्रमक झाल्या होत्या महिलांनी थेट अधिकाऱ्यांना चोप देण्याचाही प्रयत्न यावेळी केला होता . विशेष म्हणजे या ठिकाणी स्वतः आमदारावर एकनाथराव खडसे यांनी सुद्धा या आंदोलनमध्ये सहभाग घेतल्याने दिपनगर प्रशासनाचे प्रोजेक्ट अभियंता शशांक चव्हाण व उप अभियंता मनोहर तायडे यांनी या ठिकाणी भेट दिली .
यावेळी अभियंतांनी सांगितले कि,एकनाथराव खडसे यांनी आम्हाला याबाबत पत्र दिले होते परंतु यावेळी खडसे यांनी खुद्द अभियंताला दिलेलं पत्र दाखवायास सांगितले असता सदर पत्र हे आमदार संजय सावकारे यांचे असल्याचे निदर्शनात आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले .
त्यामुळे एकनाथराव खडसे यांनी कोणी आमदार तुमच्यावर याबाबत दबाव आणत असेल तर ते चुकीचे असून या लोकांना न्याय न मिळाल्यास आम्ही आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असे सांगितले होते .यावेळी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली . त्यावेळी लेखी आश्वासन देण्यात येऊन संबंधित गावाच्या सी एस आर फंडामध्ये वाढ करण्यात येणार असून आम्ही वरिष्ठाकडे याबाबतचा अहवाल पाठवला आहे असे सांगण्यात आले आहे .
या आंदोलनामध्ये वेल्हाळे येथील नागो पाटील ,दे बा पाटील , जाडगाव येथील वाय आर . पाटील सर , उदळी सरपंच , उपसरपंच आजी उपस्थित होते .विशेष म्हणजे यावेळी महिलांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून आले . तसेच सिक्युरिटी गार्ड यांनी सुद्धा यावेळी आंदोलनकर्त्यांवर दबाव टाकल्याचे दिसून आले