राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून शहरात जास्त प्रमाणात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवरच जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेडी यांनी शहरातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा यांना दिले आहेत.
त्यांच्या या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोह गजानन देशमुख,विनोद पाटील, महेश महाजन,विष्णू बिराडे,ईश्वर पाटील, रणजीत जाधव,राहुल महाजन अशा सर्वांचे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पथक तयार करण्यात आले.
शहरातील वारंवार होणाऱ्या मोटरसायकलीच्या चोरीची माहिती गुप्त बातमीदार तर्फे वरील पथकातील अंमलदार पोह विनोद पाटील यांना मिळाली होती. यानुसार टाकरखेडा येथे राहणारा विशाल गोपाल भोई हा चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथक बरेच दिवसापासून त्याच्या मागावर होते. मात्र पोलिसांची नजर चुकवून त्याची ओळखलं पण तो वारंवार फिरत होता. अमलदार यांना माहिती मिळाल्याने त्याला टाकरखेडा येथून ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन केलेला सूर्य बाबत विचारपूस केली. यावी त्याने त्याचे दोन साथीदार देवानंद उर्फ आनंद बजरंग सुरडकर आणि सुरज अशोक पारधी यांची नावे सांगितली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दहा मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. या चोरी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित दोन मोटरसायकल यांचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे