राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीत जागावाटपवरून आता ठिणगी उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उमेदवारी जाहीर केली होती. त्यावरून शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना चांगले फटकारले आहे. ते म्हणाले, शिवसेनेने एकट्याने उमेदवार घोषित करणे बरोबर नाही, तिन्ही पक्ष मिळून उमेदवार ठरवला जाईल शिवसेनेच नेते येणार आणि उमेदवार जाहीर करणार असा अधिकार कोणालाही नाही असे पवार म्हणाले आहेत.
दरम्यान संजय राऊत यांनी जाहीर केलेल्या उमेदवारीवरून काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कुठलाही निर्णय न होता उमेदवार जाहीर करणे चुकीचा आहे. पवार साहेब म्हणतात, ते बरोबर आहे. कारण जेव्हा तिन्ही पक्षाचा निर्णय होईल तेव्हाच उमेदवार जाहीर केले पाहिजे.
दरम्यान शरद पवार यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले अनेक मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देतात. आम्ही तसा संदेश दिला चुकीचे नाही असेही राऊत म्हणाले.राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून जागावाटपावरून दावेप्रतिदावे होत आहेत..