राजमुद्रा : श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात बालरोग विभाग शासकीय आयुर्वेद रुग्णालय जळगाव यांच्या अनमोल सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सचिव माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संचालक भगवान लाडवंजारी , मुख्याध्यापक दिवाकर जोशी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर राहुल चौधरी , डॉक्टर बबीता मंडल , डॉक्टर मयूर बनसोडे , डॉक्टर हर्षदा बनसोडे , डॉक्टर अनुराधा उपस्थित होते. त्यांनी इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व या विद्यार्थ्यांना सुवर्णप्राशन डोस देण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली बहुसंख्य पालकांनी या आरोग्य तपासणी शिबिरात आरोग्य तपासणी करून घेतली.
आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे सचिव माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आरोग्याचे महत्त्व सांगितले व सर्व ४०० विद्यार्थी , विघार्थीर्णीनी व ६० पालकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमाचे नियोजन दिनेश पाटील सर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल चाटे सर यांनी केले आभार अमित तडवी सर यांनी मानले, आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच बालरोग विभाग शासकीय आयुर्वेद रुग्णालय जळगाव यातील कर्मचाऱ्यांनी अनमोल असे सहकार्य केले