जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्ण संख्येत वाढ झाली होती. यावेळी अधिकतर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू लागल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. ही अडचण लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केंद्रातर्फे ऑक्सीजन जनरेशन प्लांट उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाला आवश्यक असणारी मशनरी रुग्णालयात दाखल झाली आहे. सोमवारी मशनरीच्या इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण केले जाणार आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन कामाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे