राजमुद्रा : आगामी विधानसभेच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा(Amit Shaha )दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. दरम्यान भाजपच्या आढावा बैठकीसाठी ते आज नागपुरात येत असून या आढावा बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) अनुपस्थितीत राहणार असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.तसेच आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात नितीन गडकरी यांना लांब तर ठेवले जात नाहीये ना? असा प्रश्नही यानिमित्याने उपस्थित केला जात आहे. शिवाय या बैठकीनंतर नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची किती धुरा हातात राहतील याबद्दल देखील प्रश्नचिन्ह कायम असल्याचे बोलले जात आहे.
नागपुरातील आढावा बैठकीनंतर मंत्री अमित शहा लगेचच शहरातील सुरेश भट सभागृहात भाजपच्या विदर्भ आढावा बैठकीसाठी पोहोचतील. या बैठकीला नागपूरसह विदर्भातील सर्व 62 मतदारसंघातील प्रमुख पंधराशे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर प्रमुख नेतेही उपस्थित असणार आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जम्मू-काश्मीर मधील निवडणूक प्रचाराचा नियोजित दौरा आहे. त्यामुळे स्थानिक भाजप खासदार आणि भाजपचे प्रमुख नेते असूनही गडकरी या कार्यकर्ता संवाद बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र,नितीन गडकरींची अनुपस्थितीमुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चेला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगलाच फटका दिला होता. दरम्यान महायुतीला विदर्भातून भाजपला अपेक्षेप्रमाणे कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यासाठी आणि नव्या दमाने काम करण्यासाठी अमित शहा यांचा विदर्भ दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..