राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारू वाहू लागले असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आला असून वांद्रे पश्चिम मध्ये त्यांनी मोठा डाव टाकला आहे. वांद्रे पश्चिममधून सध्या आशिष शेलार आमदार आहेत. तसेच ते भाजपाचे मुंबईतील प्रमुख नेते आहेत.या निवडणुकीसाठी काँग्रेस आशिष शेलार यांना घेरण्याच्या प्लानिंगमध्ये आहे. त्या दृष्टीने काँग्रेसने पावल उचलायला सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्या विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे.तसं झाले तर भाजपा नेते आशिष शेलार यांच्या विरुद्ध प्रिया दत्त उमेदवार असू शकतात.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्त यांनी 2014 आणि 2019 ला लोकसभा निवडणूक लढवली. दोन्हीवेळा पुनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा 2024 मध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव केला. लोकसभेला प्रिया दत्त यांनी वर्षा गायकवाड यांच्यासाठी प्रचार केला होता. गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना देखील प्रिया दत्त हजर होत्या.
दरम्यान काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुकी प्रिया दत्त यांनी माझा प्रचार केला होता त्याचे आभार मानण्यासाठी मी तिथे गेले होते मात्र आता वांद्रे पश्चिम मतदारसंघाबाबत विशेष चर्चा झाली नाही. पण त्या तिथून चांगल्या उमेदवार ठरु शकतात असेही त्या म्हणाल्या.